कवि:- संजय वासनिक
शीर्षक:-*महाराष्ट्र देशा*
पता:- चेंबुर , मुंबई, महाराष्ट्र
भ्रमणध्वणी :- ९८६९०८१४८४.
—————
*महाराष्ट्र देशा*
महाराष्ट्र देशा
माझ्या मराठमोळ्या देशा
ईथे नांदती विविध भाषा
पश्चिम तटाची कोंकणी
आणी मालवणी
उत्तरेस बोले अहिराणी
मराठी जी बोले पुण्याची
मध्य मराठा ठासुन बोले
गायी शिवरायाची गाणी ..
दक्षिनेला बोलती दख्खणी ..
विदर्भात बोले वर्हाडी
सोबत चाले झाडी अन लांजी ...
मुबंईची बोली खिचडी कशी
काय ती शब्दाची फोडणी ...
देश महाराष्ट्र हा पुरोगामी तितुका
शिवराय ते आंबेडकर महान हा ईतुका
ईथे जन्मले संत महात्मे उगीच न कौतुका
ज्ञानेश्वर ते तुकडोजीं हे देणं ह्या मातीचा
रण दुंदुभी गाजे सह्याद्री च्या कपारी
शिवाजी संभाजी ची तळपे तलवार न्यारी
रयतेच्या रक्षणार्थ देह ठेवला या भुमीवरी
अस्पृश्य म्हणती जयांना अशा पोलादी
विरांनी ही कापला चाळीसपट अरी उरी ..
मराठी विरांचे झेंडे फडकती अटकेवरी..
तळपी तलवार ही अखिल भारतावरी ...
वैनगंगा, कन्हान , कृष्णा अन गोदावरी
धर्माचे सौख्य नांदे ईथे शांत नदीतिरी
एक पिके ना पिकती बहुत पिके शेतावरी
भात कापुस सोया उस माळावर अंगुरी
तुर हरभरा ज्वारी बाजरी अन लाखोरी ...
घाटमाथा पठार पर्वत शांत समुद्रा तिरी
वनवन फिरुन वारा बसे किर्र जंगलापरी
निसर्गाची काय ही लिलया तर्र्हा
पुर्वदेश अन पश्चिम किनारा
नुसताच होई जलमय बिचारा
मध्यदेश हा पाण्याविन कोरडा निरा
जंगल संपतीचा अफाट पसारा
खनिजद्रव्य चा साठी ना पडे अपुरा ...
बहुरंगी, बहुढंगी विविधतेत नटनारा
अमुचा देश मराठमोळा प्यारा
महाराष्ट्र देश आमुचा प्यारा ...
# संजय वासनिक “ वासु”
No comments:
Post a Comment